नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांपासून देशातील अनेक राज्यांमध्ये पाऊस (rain update) पडत आहे. शनिवारी सकाळी दिल्ली-एनसीआरसह (delhi rain) अनेक राज्यांमध्ये पाऊस झाला, त्यामुळे सर्वत्र पावसाचे वातावरण झाले आहे. हवामान खात्यानुसार, दिल्ली, गुजरात, महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.
कडक उन्हाचा सामना करणाऱ्या दिल्ली-एनसीआरला शनिवारी सकाळी पावसाने दिलासा दिला. आयएमडीने (imd) दिल्ली-एनसीआरमध्ये पुढील तीन दिवस पावसाचा इशारा दिला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार १६-१७ आणि १८ सप्टेंबर रोजी पावसाची शक्यता आहे.
गुजरातमध्ये अतिवृष्टीबाबत रेड अलर्ट
त्याचवेळी IMD ने गुजरातमध्ये अतिवृष्टीबाबत रेड अलर्ट (Gujarat Red Alert ) जारी केला आहे. हवामान खात्याच्या मते, 16 ते 18 सप्टेंबर दरम्यान गुजरातमध्ये 204.4 मिमीपेक्षा जास्त पाऊस पडू शकतो. याशिवाय 19 सप्टेंबरसाठी ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी करण्यात आला आहे. आयएमडीच्या म्हणण्यानुसार, 18 ते 19 सप्टेंबर दरम्यान सौराष्ट्र आणि कच्छमध्ये पावसाबाबत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
महाराष्ट्र आणि गोव्यातही पाऊस
हवामान खात्याने महाराष्ट्र, गोवा आणि कोकणात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.(Maharashtra rain update) 17 सप्टेंबरपर्यंत कोकण आणि गोव्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. याबाबत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय आज मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने मध्य महाराष्ट्रातील भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
मध्य प्रदेश आणि राजस्थानची स्थिती कशी असेल?
IMD ने मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान खात्यानुसार, 16 ते 17 सप्टेंबर दरम्यान पश्चिम मध्य प्रदेशात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यासोबतच पश्चिम मध्य प्रदेशातील भागांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर पश्चिम राजस्थानमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. IMD ने सांगितले की 17 सप्टेंबर रोजी 115.6 ते 204.4 मिमी पर्यंत मुसळधार पाऊस अपेक्षित आहे.