पुणे – आकर्षक पगार असतानाही वरकमाईसाठी विविध मार्गांचा उपयोग करून सरकारी कर्मचारी सरळसरळ लाच मागतात. अशांवर कारवाई देखील केली जाते. गेल्या साडेचार वर्षांत राज्यात 3 हजार 407 लाचखोरीचे यशस्वी सापळे झाले आहेत. त्यामध्ये 4 हजार 649 आरोपींवर गुन्हे दाखल झालेले आहेत. मात्र, यातील फक्त 125 प्रकरणे शिक्षेपर्यंत पोहचली. त्यातील 157 जणांना शिक्षा झाली आहे.
आतापर्यंत झालेल्या शिक्षांमध्ये 25 क्लास-वन अधिकाऱ्यांना शिक्षा झाली, तर द्वितीय व तृतीय श्रेणीसह 132 कर्मचाऱ्यांना दोषी मानत न्यायालयांनी शिक्षा सुनावल्या. दिवसेंदिवस लाचखोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहेत. ऍन्टी करप्शन विभागाकडून लावले जाणारे सापळेही यशस्वी होतात. पण त्याचे रुपांतर शिक्षेत होण्याचे प्रमाण नगण्य असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उपलब्ध केलेल्या माहितीच्या आधारे स्पष्ट झाले आहे. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यापासून विविध विभागांतील वर्ग-एकच्या अधिकाऱ्यांपर्यंत लाचेची मागणी केल्याचे प्रकार घडत असतात. यात महसूल विभाग नेहमीप्रमाणे लाचखोरीत सर्वांत वर आहे. तर त्याखालोखाल पोलीस खात्याचा नंर लागतो. प्रकरणांमध्ये होणारा तपासविलं हा आरोपींच्या पथ्यावर पडत आहे.
विलंबच पडतो आरोपींच्या पथ्यावर
प्रत्यक्षात गुन्हा दाखल होण्यापासून दोषारोपपत्र दाखल करण्यास लागणाऱ्या परवानग्या लवकर न मिळाल्यामुळे खटले लांतात. खटल्याची सुनावणी लांल्यानदेखील फितुरीचे प्रमाण वाढण्याची शक्यता वाढत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. परिणामी, गुन्हा सिद्ध होण्याचे प्रमाण नगण्य आहे. सध्या अभियोग पूर्वमंजुरीमध्येही बरीच प्रकरणे अडकतात. सध्या अभियोग पूर्वमंजुरीसाठीची 282 प्रकरणे अद्यापही प्रलंबित आहेत. त्यातील शासनाकडे 108 , तर सक्षम अधिकाऱ्यांकडे 174 प्रकरणे प्रलंबित आहेत.
लाचखोरीच्या प्रकरणांमध्ये कारवाई केलेल्या व्यक्ती अथवा अधिकाऱ्यांचा हेतू महत्त्वाचा असतो. मात्र, दहापैकी चार प्रकरणांमध्ये फिर्यादीचे प्रत्यक्ष कामच नसते. स्वत:चे काम झाल्यानंतर नागरिकांकडून अशा कारवाईसाठी पाठपुरावा केला जातो. त्यामुळे हेतू सिद्धच होत नाही. तर, अनेक प्रकरणांमध्ये आरोपी आणि फिर्यादींचे व्यक्तीगत वाद असतात. यातून कारवाई केल्याचे उघड होते. त्यामुळेया प्रकरणांमध्ये आरोपी निर्दोष सुटण्याचे प्रमाण अधिक असते, असे फौजदारी वकील ऍड. सुहास कोल्हे म्हणाले.
राज्यातील वर्षनिहाय लाचखोरी प्रकरणे
2019 वर्ष – 866 दाखल गुन्हे – 891 आरोपी -आरोपी 54 (65 आरोपी) शिक्षा झालेली प्रकरणे
2020 वर्ष – 663 दाखल गुन्हे – 999 आरोपी -10 आरोपी -(14 आरोपी) शिक्षा झालेली प्रकरणे
2021 वर्ष – 778 दाखल गुन्हे – 1098 आरोपी – 18 (19 आरोपी) शिक्षा झालेली प्रकरणे
2022 वर्ष -778 दाखल गुन्हे – 1034 आरोपी – 32 (42 आरोपी) शिक्षा झालेली प्रकरणे
2023 मे – 372 दाखल गुन्हे – 527 आरोपी – 11 (15 आरोपी) शिक्षा झालेली प्रकरणे