मुंबई – राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यानंतर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह लवकरचं मुंबई दौरा करणार आहेत. त्यामुळे राज्यातील राजकारणाला नवं वळणं लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमित शाह पुढील रविवारी 16 एप्रिल रोजी मुंबईत येणार आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाणं आलं असून, अनेक उलटसुलट चर्चा सध्या सुरु आहेत.
मुंबईतील खारघरच्या सेंट्रल मैदानावर महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी अमित शहांच्या उपस्थितीत अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला जाणार आहे. आणि याच कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी अमित शहा मुबंईत दाखल होणार आहे. सध्या खारघरच्या सेंट्रल मैदानावर महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरणाचा कार्यक्रमाची तयारी सुरु करण्यात आली असून, आज स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सेंट्रल मैदानावर जाऊन याची पाहणी करण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मागील महिन्यात 19 फेब्रुवारीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोल्हापूरमध्ये आले होते. यावेळी अमित शाह यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन देखील घेतलं होत. त्यापूर्वी नागपूर दौरा देखील अमित शहा यांनी केला होता. आणि पुन्हा एकदा मुंबई दौरा करणार असून, राजकीय गोटात अनेक तर्क-वितर्क लावण्यास सुरुवात झाली आहे.