Breaking News : केंद्र सरकारचा मोठा निर्णय; आता रेमडीसीवीरची चिंता मिटणार

नवी दिल्ली, – रेमडीसीवीर औषधाच्या सर्व विद्यमान उत्पादक आणि इतर हितधारकांबरोबर झालेल्या बैठकीत रेमडीसीवीरच्या उपलब्धतेच्या समस्येचा केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांनी आढावा घेतला. या बैठकीत रेमडीसीवीर औषधाचे उत्पादन, पुरवठा वाढवण्याचा तसेच त्याच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. रेमडीसीवीरच्या सात उत्पादकांची सध्याची क्षमता दरमहा 38.80 लाख कुपी इतकी आहे. सहा उत्पादकांना दरमहा 10 लाख कुपी उत्पादन क्षमता असणाऱ्या सात अतिरिक्त जागांसाठी जलदगतीने मंजुरी देण्यात आली आहे. दर महिन्याला आणखी 30 लाख कुप्याचे उत्पादन लवकरच सुरु होईल. यामुळे महिन्याला सुमारे 78 लाख कुप्यांपर्यंत उत्पादन क्षमता वाढीस लागेल.

अतिरिक्त उपाय म्हणून, देशांतर्गत बाजारपेठेत रेमडीसीवीरचा पुरवठा वाढवण्यासाठी 11 एप्रिल रोजी “डीजीएफटी’द्वारे रेमडेसिविर इंजेक्‍शन व रेमडेसिविर इंजेक्‍शन तयार करण्यासाठी लागणाऱ्या अत्यावश्‍यक घटकांच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. सरकारी हस्तक्षेपानंतर, निर्यातीसाठी राखून ठेवलेल्या अंदाजे 4 लाख रेमडीसीवीर कुपींचा पुरवठा उत्पादकांकडून देशांतर्गत गरजा भागवण्यासाठी वळवला जात आहे. ईओयु, सेझ युनिट्‌स देखील देशांतर्गत बाजारपेठेत पुरवठा करण्यासाठी सक्षम केली जात आहेत. रेमडीसीवीर इंजेक्‍शनच्या उत्पादकांनी स्वेच्छेने या आठवड्याच्या अखेरीस 3500 रुपयांहून कमी केली आहे.

रुग्णालय, संस्था पातळीवरील पुरवठा पूर्ण करण्यास प्राधान्य देण्याचे निर्देश रेमडीसीवीरच्या उत्पादनांना देण्यात आले आहेत. औषध महानियंत्रकांनी राज्ये आणि केंद्र सरकारच्या अंमलबजावणी प्राधिकरणांना रेमडीसीवीरचा काळा बाजार, साठवणूक आणि वाढीव दर आकारण्याच्या घटनांवर त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. रेमडीसीवीरच्या उपलब्धतेवर नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग ऑथॉरिटी सातत्याने देखरेख ठेवून आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.