मुंबई – गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री ‘दीपाली सय्यद’ या आपल्या सोशल मीडियावरील वक्तव्यांमुळे चांगल्याच चर्चेत आहेत. मात्र, आता पुन्हा एकदा दीपाली सय्यद प्रकाश झोतात आल्याचं दिसून येत आहे. याच कारण देखील तितकंच खास आणि वेगळं आहे.
‘अभिनेत्री दीपाली सय्यद यांचे पाकिस्तानशी संबंध असून, त्यांनी पाकिस्तानचे नागरिकत्व स्वीकारले’ असल्याचं खळबळजनक आरोप माजी स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदे यांनी केला आहे. एक पत्रकार परिषदेत शिंदे बोलत होते.
यावेळी बोलताना शिंदे म्हणाले, “अभिनेत्री दिपाली सय्यद यांचे पाकिस्तानशी संबंध असून पाकिस्तानचे नागरिकत्व स्वीकारले आहे. तसेच त्यांचे पाकिस्तानामध्ये एक बँक खाते देखील आहे. यासाठी दाऊद इब्राहिम याची पत्नी मेहजबिन कासकर हिने मदत केली असून,
सोफिया सय्यद या नावाने पाकिस्तानी नागरित्व दिले असल्याचा पुरावा भाऊसाहेब शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. सध्या त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून, आता अभिनेत्री दिपाली सय्यद शिंदे यांना काय? प्रत्युत्तर देणार हे पाहणे महत्वाचे आहे. अहमदनगर येथे शिंदे यांनी पत्रकार परिषदेत हा खुलासा केला आहे.