HSC SSC Result । महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीनं दहावी आणि बारावीच्या परीक्षा फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात झाल्या होत्या. दरम्यान, आता दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसह पालकांना निकालाचे वेध लागले आहेत. सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता राज्यातील निकालाबाबत महत्वाची माहिती समोर आलीय. बारावीचा निकाल येत्या आठवड्यात जाहीर होईल तर दहावीचा निकाल मे महिन्याच्या शेवटी जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
येत्या आठवड्यात बारावीचा निकाल ? HSC SSC Result ।
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात परीक्षा घेण्यात आली होती. बारावीच्या परीक्षेसाठी 15 लाख 13 हजार 909 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. बारावीची परीक्षा नऊ विभागीय मंडळांतर्फे आयोजित करण्यात आली होती. बारावीचा निकाल तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यात असून येत्या आठवड्यात जाहीर होणार असल्याचे म्हटले जात आहे.
दहावीच्या निकालाचे काम अंतिम टप्प्यात HSC SSC Result ।
बारावीच्या परीक्षेचा निकाल येत्या आठवड्यात जाहीर करण्यात आल्यानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमकि परीक्षा मंडळ मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात निकाल जाहीर करु शकते. दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या उत्तर पत्रिका तपासणीचं काम बोर्डाकडून तयार झालं आहे. उत्तर पत्रिका तपासणीचं काम पूर्ण झालं असून आता निकालाच तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आहे.
महाराष्ट्रात दहावीच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 2023-24 या शैक्षणिक वर्षात वाढली आहे. दहावीला 16 लाख 9 हजार 444 विद्यार्थ्यांची नोंदणी केली जाणार आहे. दहावीची परीक्षा 1 ते 26 मार्च दरम्यान पार पडली होती. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या पुणे ,नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर , अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण नऊ विभागीय मंडळांतर्फे परीक्षेचं आयोजन केलं जातं.