चतरा (झारखंड) :– झारखंडच्या चतरा जिल्ह्यात सोमवारी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत किमान पाच माओवादी ठार झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली. रांचीपासून सुमारे 160 किमी अंतरावर लावलॉंग पोलीस स्टेशन परिसरात चतरा-पलामू सीमेवर ही चकमक झाली. ठार झालेल्या माओवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत, असे चत्राचे एसपी राकेश रंजन यांनी सांगितले.
घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आल्याचे ते म्हणाले. सकाळी 8.30 च्या सुमारास चकमक सुरू झाली. जप्त केलेल्या शस्त्रांमध्ये दोन एके-47 रायफली आणि दोन देशी बनावटीच्या रायफलचा समावेश आहे.
Jammu and Kashmir : सीमेपलीकडून ड्रोनद्वारे टाकण्यात आलेला शस्त्र साठा जप्त
शोधमोहीम अजूनही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये गौतम पासवान या नक्षली म्होरक्याचाही समावेश होता. त्याच्या डोक्यावर 25 लाखांचे इनाम होते. मात्र या वृत्ताला अद्याप अधिकृत दुजोरा मिळायचा आहे.