पाणी जाण्यासाठी दुभाजक तोडला

पहिल्याच पावसात नगर महामार्गावर तळे; वाहतूक कोंडीत भर

वाघोली – वाघोली परिसरात पडणाऱ्या पावसामुळे पावसाळ्याच्या सुरुवातीलाच साई सत्यम परिसरात पुणे – नगर महामार्गाला तळ्याचे स्वरूप आले होते. महामार्गाच्या कडेला झालेल्या बांधकामामुळे पाणी जाण्यासाठी जागाच नसल्याने महामार्ग काहीकाळ पाण्याखाली गेला होता. ग्रामपंचायत कर्मचारी, पोलीस व ग्रामस्थांनी रस्ता दुभाजक तोडला. त्यानंतर महामार्गाचे पाणी काढण्यात यश आले आहे. यामुळे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.

नगर महामार्गावर शॉ टोयोटा शोरूमसमोरील पाण्याचा निचरा करण्यासाठी रस्ता दुभाजक तोडल्यानंतर काही प्रमाणात पाणी गेले. उर्वरित पाणी काढण्यासाठी सक्‍शन गाडीचा वापर करावा लागला. ग्रामपंचायत सदस्य सुधीर भाडळे म्हणाले की, पावसामुळे होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने सर्वतोपरी मदत करण्यात येणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.