Pimpri Big Accident: भरधाव दुचाकी रस्तादुभाजकाला धडकून भीषण अपघात; तरूण-तरूणी जागीच ठार

पिंपरी – भरधाव दुचाकी रस्तादुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात दुचाकीवरील तरूण-तरूणीचा जागीच मृत्यु झाला. पुणे – मुंबई महामार्गावर आकुर्डी येथे रविवारी (दि. 17) दुपारी सव्वातीनच्या सुमारास ही घटना घडली. अपघात एवढा भीषण होता की दुचाकीवर मागे बसलेली तरूणी 25 ते 30 फुट उंच उडून पडली. तर, मोटारसायकलने 50 मीटर अंतर फरफटत जाऊन पेट घेतला. दरम्यान, मोटारसायकल दुभाजकाला धडकल्यानंतर पुढे चाललेल्या दुचाकीला ठोकर दिल्याने दुचाकीवरील दोन सख्ख्या बहिणी जखमी झाल्या.

आर्यन नरेंद्र परमार (वय 23, रा. खडकी) आणि श्‍वेता अशोक गजभिवे (वय 21, रा. भंडारा) असे मृत्यू झालेल्या तरूण-तरूणीचे नाव आहे. तर, अपघातग्रस्त मोटारसायकल धडकल्याने मृणाल नरहर कुलकर्णी (वय 22) आणि मधुरा नरहर कुलकर्णी (वय 16, दोघी रा. काळेवाडी) अशी बहिणी जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

निगडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार धुमाळ यांनी याबाबत माहिती दिली. आर्यन आणि श्‍वेता हे दोघे मोटार सायकलवरून पुण्याहून निगडीच्या दिशेने चालले होते. आकुर्डी येथे तुळजाभवानी मंदीराजवळ ग्रेडसेपरेटरमधून एक मोटार बाहेर निघत होती. त्याचवेळी पाठीमागून येणाऱ्या आर्यनला रस्तादुभाजकाचा अंदाज आला नाही. आर्यनचे नियंत्रण सुटल्याने मोटार सायकल दुभाजकाला धडकली. अपघात एवढा भीषण होता की गाडीवर मागे बसलेली श्‍वेता 25 ते 30 फुट उंच उडून रस्तयावर पडली. डोक्‍याला गंभीर दुखापत झाल्याने श्‍वेता आणि आर्यन या दोघांचा जागीच मृत्यू झाला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.