रांजणगाव गणपती- ढोकसांगवी (ता. शिरूर) येथील एस. के. एच. कंपनी समोरील रस्त्यावर बेकायदेशीर जमाव जमवून व रस्ता खोदून जमावबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी ढोकसांगवी येथील 13 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी दिली. याबाबत एस.के.एच. कंपनीचे मनुष्यबळ विकास अधिकारी सुधीर भागवत शिंदे यांनी रांजणगाव पोलिसांत फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी रांजणगाव पोलिसांनी ओंकार प्रकाश अभंग, ज्ञानेश्वर रोहिदास अभंग, प्रमोद दिगंबर अभंग, किरण रमेश अभंग, तुषार राजेंद्र अभंग, स्वप्निल प्रकाश अभंग, गणेश बाळू अभंग, सुभद्रा बाळू अभंग, आकाश अभंग, सुनिता चंद्रकांत अभंग, छाया दिगंबर अभंग, जिजाबाई रमेश अभंग यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास पोलीस कर्मचारी तुषार पंधारे हे करीत आहे.