ब्रासिलिया – ब्राझिलचे विद्यमान अध्यक्ष जेर बोल्सेनारो (Jair Bolsonaro) यांनी अध्यक्षीय निवडणुकीतील आपल्या पराभवाचे खापर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांवर आणि सॉफ्टवेअरमधील दोषावर फोडले आहे. निवडणुकीचा निकाल लागून गेल्यानंतर जवळपास तीन आठवड्यांनंतर बोल्सेनारो यांनी या पराभवाबद्दल भाष्य केले आहे.
निवडणुक आयोगाने इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावर करण्यात आलेली मते रद्द करावीत, अशी मागणीही बोल्सेनारो यांनी ब्राझिलच्या निवडणूक आयोगाकडे केली आहे. मात्र इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमधील “व्हायरस’चा परिणाम मतदानाच्या विश्वासार्हतेवर होणार नाही, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांवर केलेली मते बाद ठरवली तर बोल्सेनारो यांना 51 टक्के मते मिळाल्याचा निकाल लागेल. त्यामुळे सहाजिकच निवडणुकीत त्यांचा विजय होईल. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांवरील मते बाद ठरवण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आली आहे.
Border Dispute : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाला पंडित नेहरूच जबाबदार – सुधीर मुनगंटीवार
निवडणुकीत विजयी झालेले माजी अध्यक्ष लुला यांनी आणि बोल्सेनारो यांच्या निकटच्या सहकाऱ्यांनीही निवडणुकीचा निकाल स्विकारला आहे. मात्र बोल्सेनारो यांनी अद्याप हा निकाल स्विकारलेला नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावरील मते बाद ठरवण्याला विरोध होऊ लागला आहे.