नवी दिल्ली : मुझफ्फरपूर अनाथाश्रमातील लैंगिक शोषणाच्या प्रकरणात ब्रजेश ठाकूरसह अन्य 18 जणांना सामुहिक बलात्कार आणि लैंगिक शोषणाच्या आरोपावरून दोषी ठरवले.
सध्या तिहार कारागृहात असणाऱ्या 20 आरोपींना वकीलांच्या संपामुळे न्यायालयात आणता आले नव्हते. त्यामुळे या प्रकरणाचा निकाल जाहीर करण्यास महीनाभर विलंब लागला. या प्रकरणात न्यायालयात 20 मार्च 2018मध्ये दोषारोपपत्र ठेवण्यात आले. त्यात ठाकूर हा बलात्कार करणे आणि लैगिक शोषणाच्या प्रकरणाचा सूत्रधार असल्याचे नमूद केले होते. या आरोपींमध्ये 12 पुरूष आणि आठ महिला आरोपींचा समावेश होता.
ठाकूर आणि त्याच्या अनाथाश्रमातील कर्मचाऱ्यांसह समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांना या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले. त्यांच्यावर आपल्या कर्तच्याबाबत निष्काळजीपणा आणि मुलींना मारहाण केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्याच्यावर बालकांशी क्रुर वर्तुणूक ठेवल्याचा आरोप ठेवण्यात आला होता.