मुंबई – या वर्षीचा बिग बजेट सिनेमा ‘ब्रम्हास्त्र’ रिलीजच्या उंबरठ्यावर आहे. चित्रपटाचा एक प्रोमो रिलीज करण्यात आला. ज्यामध्ये साऊथ स्टार नागार्जुनची आक्राळ विक्राळ भूमिका पाहायला मिळत आहे. चित्रपटाचे ऍडव्हान्स बुकिंग सुरु झालेले असताना नवीन अस्त्रांची माहिती देणारा प्रोमो खूपच रंजक वाटत आहे.
नवीन प्रोमोमध्ये ‘ब्रह्मास्त्र’चे स्पेशल इफेक्ट्स आणखीनच दमदार दिसत आहेत. एका दृश्यात रणबीर कपूर त्याच्या शक्तीचा म्हणजेच अग्नी अस्त्राचा पुरेपूर वापर करत आहे. व्हीएफएक्समुळे हे दृश्य खूपच प्रभावशाली दिसत आहे. प्रोमोमध्ये सापाच्या रूपात धनुष्यातून निघणाऱ्या बाणांचा आणि हत्तीचा आकार घेतलेल्या शक्तीची झलक दाखवण्यात आली आहे.नवीन प्रोमोमध्ये या दोघांची नावे नाग धनुष आणि गजास्त्र अशी देण्यात आली आहेत. या शस्त्रास्त्रांचे सामर्थ्य कोणाकडे आहे, त्यांची पात्रे कोण साकारत आहेत, हे प्रोमोमध्ये स्पष्ट नाही, पण चित्रपटात ते पाहणेही रंजक ठरणार आहे.
‘ब्रह्मास्त्र’च्या नव्या प्रोमोमध्ये नागार्जुनचा टेरर अवतार दिसत आहे. चित्रपटात नंदी-अस्त्राची भूमिका करणारा नागार्जुन नवीन प्रोमोमध्ये पूर्ण अॅक्शन मोडमध्ये दिसत आहे. नागार्जुनचे रौद्र रूप पाहून अनेकांनी हा सिनेमा थेटरमध्ये जाऊन पाहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ‘ब्रह्मास्त्र’ 9 सप्टेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे.त्यामुळे मोठ्या पडद्यावर ‘ब्रह्मास्त्र’ पाहण्याची वाट पाहणाऱ्या चाहत्यांसाठी हा नवीन प्रोमो बुस्टरचंच काम करणार आहे.