मुंबई – रणबीर कपूरचा ब्रम्हास्त्र चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला होता. अनेकांनी त्यावर कमेंट करत आपल्या प्रतिक्रिया देखील दिल्या. परंतु आता या चित्रपटापूर्वीचे रणबीरचे काही फोटो समोर आले आहेत. जे की त्याच्या लूक टेस्टचे असल्याचे बोलले जात आहे. जेष्ठ अभिनेत्री आणि रणबीरची आई नितु कपूरने हे फोटो शेअर केले आहेत.
रणबीरचे कधीही न पाहिलेले हे शर्टलेस फोटो त्याच्या आईने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर करत रणबीरच्या मेहनतीचे कौतुक केलं आहे. हे फोटो बल्गेरियामध्ये शूट करण्यात आले होते. यानंतरच ब्रम्हास्त्रमध्ये रणबीरचे कास्टिंग निश्चित करण्यात आले. रणबीरचा ट्रेनर आणि लाइफस्टाइल कोच कुणाल गिर याने देखील हे फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये रणबीर कपूर शर्टलेस स्टाईलमध्ये फक्त जीन्स घातलेला दिसत आहे. यामध्ये त्याचे सिक्स पॅक अॅब्स लक्ष वेधून घेत आहेत. दोनही फोटोंमध्ये अभिनेता अग्रेसिव्ह पोज देताना दिसत आहे. रणबीरचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.चाह्ह्त्यांनी फोटोचे स्वागत केले आहे तर ट्रोलर्सने मात्र फिटनेसबाबत आश्चर्य व्यक्त केलं आहे.
View this post on Instagram
रणबीर कपूर सध्या पत्नी आलिया भट्टसोबत आपल्या पहिल्या मुलाचे स्वागत करण्याच्या तयारीत आहे. ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या बेबी बंपसोबतचे अनेक लूक्स आणि फोटो समोर आले होते. यासोबतच आलिया भट्ट तिच्या बेबी बंपचे फोटोही चाहत्यांसोबत शेअर करत असते.