मुंबई – चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर फ्लॉप होवो अथवा सुपरहिट होऊद्या पुढील दोन ते तीन महिन्यात तो एकतर टीव्हीवर तरी येतो किंवा एखाद्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तरी झळकतो. सध्या प्रेक्षकांना ओटीटीमध्ये देखील भरपूर पर्याय उपलब्ध आहेत त्यामुळे अनेकजण चित्रपट तिकीट काढून पाहण्यापेक्षा ओटीटीवर पाहणे पसंद करतात. नुकतेच प्रदर्शित झालेल्या पीएस १ आणि ब्रम्हास्त्र हे दोन्हही चित्रपट सध्या ओटीटीवर प्रदर्शित झाले आहेत.
या वर्षीचा सर्वात मोठा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’ 9 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. ‘ब्रह्मास्त्र’ने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली. रिलीजच्या पहिल्याच दिवसापासून ‘ब्रह्मास्त्र’ची अशी जादू चालली की प्रेक्षक चित्रपटगृहांकडे ओढले गेले. पण ‘ब्रह्मास्त्र’च्या ओटीटी रिलीजची अनेकांना प्रतीक्षा होती.अखेर ती प्रतीक्षा आता संपली आहे. ब्रम्हास्त्र ‘हॉटस्टार’वर प्रदर्शित झाला असून ज्यांच्याकडे सब्स्क्रिप्शन आहे त्यांना तो मोफत पाहता येणार आहे.
2018 पासून चित्रपटांपासून दूर असलेली अभिनेत्री ऐश्वर्या रायची कारकीर्द पीएस १ या चित्रपटापासून पुन्हा सुरु झाली. मनीरत्नम दिग्दर्शित ऐश्वर्याचा ‘पोनियिन सेल्वन-1’ अर्थात PS १ प्रदर्शित होऊन गेला.या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. ‘पोनियिन सेल्वन-1’ मध्ये चोल साम्राज्याच्या इतिहासाशी संबंधित एक कथा आहे. चित्रपटात ऐश्वर्यासोबत चियान विक्रम, कार्ती, जयम रवी, त्रिशा आणि प्रकाश राज यांच्यासह अनेक दमदार कलाकार आहेत. हा चित्रपट देखील आता ओटीटीवर पाहता येणार आहे. अमेझॉन प्राईमवर हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला असून सब्स्क्रिप्शन असणाऱ्यांना हा चित्रपट पाहता येणार आहेत.