India vs South Africa, Boxing Day Test Match : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना बॉक्सिंग डेपासून सुरू होणार आहे. 26 डिसेंबरपासून सेंच्युरियनमध्ये हा सामना खेळवला जाणार आहे. यासाठी टीम इंडियाने तयारी सुरू केली आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ विजयाच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. यावेळी कसोटी संघात अनेक बदल पाहायला मिळतील. चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे या वरिष्ठ खेळाडूंना संघात स्थान मिळालेले नाही. त्यामुळे अनुभवी खेळाडूंसोबतच काही युवा खेळाडूही संघात दिसणार आहेत.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जाणार्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारताच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हनवर नजर टाकल्यास यशस्वी जैस्वालला त्यात स्थान मिळू शकते. यशस्वीला सलामीची संधी मिळू शकते. शुभमन गिलही ओपन करू शकतो. गिलने सलामी दिल्यास रोहित शर्मा स्वतः मधल्या फळीत प्रवेश करू शकतो. गिलने सलामी दिली नाही तर तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. अशा स्थितीत विराट कोहली चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. तर यष्टीरक्षक म्हणून के.एल.राहुलची जागा निश्चित असून तो 5 किंवा 6 क्रमाकांवर खेळू शकतो.
गोलंदाजीसाठी टीम इंडियाने मुकेश कुमारचा समावेश केला आहे. देशांतर्गत सामन्यांमध्ये मुकेशचा रेकॉर्ड चांगला आहे. तो प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवू शकतो. शार्दुल ठाकूरलाही स्थान मिळू शकते. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनाही प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकते. या दोघांची जागा जवळपास निश्चित झाली आहे. अष्टपैलू रवींद्र जडेजाही प्लेइंग इलेव्हनचा भाग असू शकतो.
भारताचे संभाव्य खेळाडू : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि मुकेश कुमार.