BIG Update On Hardik Pandya’s Return To Team India : भारतीय अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या कधी पुनरागमन करणार? हार्दिक पांड्या IPL 2024 च्या मोसमात खेळू शकेल का? गेल्या काही दिवसांपासून हार्दिक पांड्याच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पण आता भारतीय चाहत्यांव्यतिरिक्त मुंबई इंडियन्ससाठी एक आनंदाची बातमी येत आहे.
खरंतर हार्दिक पांड्या लवकरच मैदानात परतणार आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात 3 टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 11 जानेवारीला होणार आहे. या मालिकेत टीम इंडियाचा कर्णधार म्हणून हार्दिक पांड्या दिसणार आहे.
अफगाणिस्तानविरुद्ध हार्दिक पांड्याचं पुनरागमन निश्चित!
अलीकडे असे मानले जात होते की, हार्दिक पांड्या कदाचित आयपीएल 2024 मध्ये खेळू शकणार नाही, परंतु आता मुंबई इंडियन्ससाठी एक दिलासादायक बातमी आहे. हार्दिक पांड्या आयपीएल 2024 च्या मोसमात खेळणार हे निश्चित आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हार्दिक पांड्या घोट्याच्या दुखापतीतून पूर्णपणे बरा झाला आहे. तो सतत प्रशिक्षण घेत आहे. मात्र, अफगाणिस्तान मालिकेत हार्दिक पांड्याचे पुनरागमन निश्चित आहे.
भारत-अफगाणिस्तान मालिकेचे वेळापत्रक काय आहे?
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात 3 टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 11 जानेवारीला मोहालीत होणार आहे. यानंतर दुसरा सामना 14 जानेवारीला इंदूरमध्ये होणार आहे. त्याचवेळी, या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा टी-20 17 जानेवारीला बंगळुरूमध्ये खेळवला जाईल.
AUS-W Vs IND-W Test : ऑस्ट्रेलियाला पराभूत करत Team India ने रचला इतिहास….
भारत-अफगाणिस्तान टी-20 मालिकेत हार्दिक पांड्या टीम इंडियाचा कर्णधार असेल. मात्र, भारतीय संघाचा मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादव दुखापतीमुळे खेळू शकणार नसला तरी हार्दिक पांड्याचे पुनरागमन ही चाहत्यांसाठी निश्चितच आनंदाची बातमी आहे.