कंगना-दिलीज वादात बॉक्सर विजेंदर सिंहची उडी, कंगनाच्या प्रश्नावर दिला जबरस्त ‘ठोसा’

मुंबई – केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत सध्या पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला 26 नोव्हेंबर रोजी सुरुवात झाली असून, आज या आंदोलनाचा ११ वा दिवस आहे. दरम्यान, शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आणि सरकार यांच्यातल्या चर्चेच्या फेऱ्यांमधून अद्याप काहीही ठोस निर्णय झालेला नाही; परंतु बाहेर शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पाठिंब्यात वाढ होताना दिसत आहे. देशातील सामान्यांपासून ते सिनेकलाकार, राजकीय नेते, खेळाडू या सर्वांनीच  शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

दरम्यान, अभिनेत्री कंगना राणावत हिने शेतकरी आंदोलनाबाबत काही दिवसांपूर्वी केलेल्या एका फेक ट्विटमुळे आणि आंदोलनाला विरोध केल्यामुळे कंगना आणि पंजाबी गायक, अभिनेता दिलजीत दोसांज यांच्यात चांगलाच वाद निर्माण झाला आहे.

कंगनाने दिलजीत दोसांजला रिप्लाय देताना एका ट्विटमध्ये त्याचा उल्लेख करण जोहरचा ‘पाळीव श्वान’ आणि ‘चमचा’ असा केला होता. मात्र, या दोघांची बातचीत सुरू असतानाच भारताचा माजी आंतरराष्ट्रीय बॉक्सर विजेंदर सिंहनेही यामध्ये उडी मारली.

कंगनाच्या त्या ट्विटवर विजेंदर सिंहने कंगनाला, चुकीच्या माणसाशी पंगा घेतलास असं म्हणत, “गलत पंगा ले लिया बहन “असा इशारा देणारं ट्विट केलं होतं. तर सर्वांनाच माहित आहे कंगनाही शांत बसणाऱ्यातली नाही. थोड्यावेळातच तिनेही विजेंदर सिंहला जोरदार प्रत्युउतर दिलं. “क्यों, तू शिवसेना बनाएगा… भाई? असं कंगना म्हणाली.

कंगनाच्या या प्रश्नावर विजेंदर सिंहनेही पुन्हा एकदा ट्विट करत प्रत्युत्तर दिलं. ‘शिवसेना तर आधीपासूनच अस्तित्वात आहे आणि कामही खूप चांगलंच करतेय’, असं बोचरं उत्तर विजेंदरने कंगनाला दिलं. त्यासोबत त्यात एक स्माइली असलेल्या इमोजीचाही वापर केला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.