Animal : संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित आणि रणबीर कपूर स्टारर ‘ॲनिमल’ ( Animal ) चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. आता पर्यंत ‘ॲनिमल’ चित्रपटाने ( Animal ) तब्बल 660.89 कोटींचा टप्पा ओलांडला असून,
आगामी काळात देखील कामाईच्या आकड्यात मोठी भर होणार असल्याचं बोललं जात आहे. ‘ॲनिमल’ यावर्षातील सर्वात मोठा दुसऱ्या क्रमांकाचा ओपनिंग चित्रपट बनला आहे.
जगभरात हिंदी भाषेतील चित्रपटाने 49.12 कोटी, तेलुगूमध्ये 40.36 आणि तमिळमध्ये 33.25 कोंटीचा टप्पा पार केला आहे. यावरून जगभरात हा चित्रपट 660.89 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे.
बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या ‘टायगर जिंदा है’, शाहरूख खानच्या ‘जवान’ आणि सनी देओलच्या ‘गदर 2’ या चित्रपटाच्या पहिल्या आठवड्यातील कलेक्शनला मागे टाकण्यात यशस्वी झाले आहे.
‘अॅनिमल’ रिलीज झाल्यानंतर काही तासांत झाला ऑनलाइन लीक
टेलिग्राम, तमिलरॉकर्स, मूवीरुल्झ, तमिलएमव्ही, फिल्मझिला, इबोम्मा यांसारख्या टोरेंट वेबसाइटवर विनामूल्य उपलब्ध झाला आहे. तसेच, हा चित्रपट रेग्युलर फॉरवर्डप्रमाणे व्हॉट्सअॅपवरही शेअर केला जात आहे. इतकंच नाही तर ‘अॅनिमल’ प्रमाणे विकी कौशलचा ‘साम बहादूर’ हा चित्रपटही इंटरनेटवर लीक झाल्याचं बोललं जात आहे.