पणजी – ग्लोबल ऑल इंडिया फ़ुटबॉल लीगचे उपविजेतेपद गॅलॅक्सि युनाइटेड एफसीने मिळविले. दिल्ली आरएमएसए एफसी विरुद्ध गॅलॅक्सि युनाइटेड यांच्यात झालेला अंतिम सामना ५-४ असा रंगला. यात गॅलॅक्सि युनाइटेड एफसीच्या आयुष घुलेला दबदबा कायम राहिला.
त्याने मागील तिन्ही सामन्यात एकूण ११ गोल करत सर्वोउत्कृष्ट खेळाडूचा बहुमान पटकाविला. विविध वयोगटात ही लीग खेळविण्यात आली. यामध्ये देशभरातून जवळपास सर्वच राज्यांनी सहभाग नोंदविला होता. यंदाच्या स्पर्धेचे यजमानपद भूषविण्याची संधी गोव्याला मिळाली होती. ७ ते ११ मे या कालावधीत लीग घेण्यात आली.
नुकत्याच झालेल्या फूटबॉल स्पर्धेत पुण्याच्या युनाइटेड फुटबॉल क्लबच्या दोन्ही संघाने जेतेपद पटकाविले. तर १४ वर्षाखालील मुलांच्या स्पर्धेत संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. याचबरोबर १० आणि १२ वर्षाखालील मुलांच्या संघाने अनुक्रमे गोवा फुटबॉल क्लबला २-० तर १२ वर्षांखालील संघाने ३-० फरकाने हरवून संघाला जेतेपद मिळवून दिले.
युनाइटेड एफसीचा खेळाडू म्हणाला,”दोन वर्षांनंतर आम्ही जिंकलेली ही पहिली ट्रॉफी आहे. मी संघासाठी खूप आनंदी आहे. ही स्पर्धा एक संघ म्हणून स्वतःला विकसित करण्याचं व्यासपीठ आहे. आणि पुढील स्पर्धेत अशीच कामगिरी करण्याचा आमचा प्रयत्न असेल.”