मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने सोशल मीडियापासून दूर राहण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यासंदर्भात स्वत: अभिनेत्रीने ट्विटर आणि इन्स्टाग्रामद्वारे एक पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. सतत एकच गोष्ट पाहणं कंटाळवाणं वाटू लागलं आहे असं म्हणतं अभिनेत्रीने सोशल मीडियापासून फारकत घेतली आहे.
शिल्पा शेट्टी म्हणाली, सतत एकच गोष्ट सोशल मीडियावर पाहून मी कंटाळली आहे. सगळीकडे तेच तेच दिसत आहे. जेव्हा मला नवं काहीतरी पाहायला मिळेल तेव्हाच मी सोशल मीडियावर परत येईल. अशी शेवटची पोस्ट करत अभिनेत्रीने सोशल मीडियापासून दुर जाण्याचा निर्णय घेतला आहे. या पोस्ट मध्ये तिने काळ्या कोऱ्या स्क्रीनचा एक फोटोही शेअर केला आहे.
View this post on Instagram
शिल्पाचे सोशल मीडियावर चांगली फॅन फॉलोअर्स आहेत. ती अनेकदा तिच्या आगामी प्रोजेक्ट्स, आरोग्य, फिटनेस आणि प्रेरणांशी संबंधित पोस्ट सोशल मीडियावर चाहत्यांसह शेअर करत असते. याशिवाय ती अनेकदा तिच्या कुटुंबियांसोबतचे फोटो आणि व्हिडिओही शेअर करत असते. तिच्या प्रत्येक पोस्टवर चाहतेही प्रेमाचा वर्षाव करतात. अभिनेत्रीचे इंस्टाग्रामवर 25 मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत.