अरुण गवळीची जन्मठेप कायम

मुंबई : कुख्यात डॉन अरुण गवळीला शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरणी सुनावण्यात आलेली जन्मठेपेची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे.

गवळीने या शिक्षेला आव्हान देत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका फेटाळली आहे. २ मार्च २००७ रोजी मुंबईमधील घाटकोपरमध्ये जामसंडेकर यांची घरात घुसून गोळी मारून हत्या केली होती. पोलिसांनी याप्रकरणी २००८ मध्ये अरुण गवळीला अटक केली. यानंतर २०१२ मध्ये विशेष न्यायालायने अरुण गवळीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

अरुण गवळीच्या सांगण्यावरुनच ही हत्या करण्यात आल्याचं पोलीस तपासात समोर आलं होतं. हत्येसाठी अरुण गवळीने ३० लाखांची सुपारी दिली होती. न्यायालायने अरुण गवळीसोबत इतर दहा जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. सोबत १४ लाखांचा दंडही ठोठावण्यात आला होता. अरुण गवळीसोबत इतरांनीही जन्मठेपेच्या शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. न्यायालयाने याचिका फेटाळली असून जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली आहे.

गवळीला या घटनेनंतर एका वर्षाने अटक करण्यात आली होती. तत्कालीन गुन्हे शाखेचे प्रमुख राकेश मारिया, अतिरिक्त पोलिस आयुक्त देवेन भारती, पोलीस निरिक्षक दिनेश कदम, धनंजय दौंड, नीनाध सावंत, योगेश चव्हाण यांच्या पथकाने अरुण गवळीला त्याच्या दगडी चाळीत जाऊन अटक केली होती.

 

Leave A Reply

Your email address will not be published.