‘तान्हाजी’ चित्रपटाचा मराठी टिझर पाहिलात का?

मुंबई – बॉलिवूड अभिनेता अजय देवगनचा आगामी चित्रपट ‘तान्हाजी – द अनसंग वॉरिअर’, हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तान्हाजी मालुसरे यांच्या धाडसावर हा चित्रपट आधारित आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचा हिंदी ट्रेलर प्रदर्शित झाला होता. दरम्यान, आज (दि. ९) तान्हाजी चित्रपटाचा मराठी भाषेतील ऑफिशल टिझर प्रदर्शित करण्यात असून, उद्या चित्रपटाचा मराठी ट्रेलर प्रदर्शित होणार आहे.

दरम्यान, १० जानेवारीला हा चित्रपट सिनेमागृहात झळकणार आहे. अभिनेता अजय देवगन, सैफ अली खान, शरद केळकर आणि अभिनेत्री काजोल अशी तगडी स्टारकास्ट चित्रपटात दिसून येणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)