सीआरपीएफ जवानाची आत्महत्या

रायपूर (छत्तिसगढ) : केंद्रीय राखीव पोलिस दलातील जवानाने स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केली. छत्तिसगढमधील दंतेवाडा जिल्ह्यता ही घटना घडली.

दंतेवाडा येथील गीडम बस स्थानकावर सोमवारी ही घटना घडली. केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या 170व्या बटालीयनचे 22 कर्मचारी नाश्‍त्यासाठी थांबले होते. त्यावेळी ही घडना घडल्याचे दंतेवाडाचे पोलिस अधिक्षक अभिषेक पल्लव यांनी सांगितले.

ते म्हणाले, या जवानाचे नाव विनित नरवाल असे असून त्याने त्याच्याकडील एसएलआर रायफलमधून स्वत:वर गोळी झाडली. त्याला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचारापुर्वीच तो मरण पावल्याचे डॉक्‍टरांनी स्पष्ट केले. नरवाल यांची नियुक्ती नजिकच्या विजापूर जिल्ह्यात करण्यात आली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.