पुणे – खून प्रकरणात अटकेत असलेल्या व मोक्कानुसार कारवाई झालेल्या दोघांच्या कोठडीत न्यायालयाने चार दिवसांची वाढ केली आहे. विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी हा आदेश दिला.
गणेश लक्ष्मण जाधव (वय ३०, रा. पुरंदर) आणि संकेत सुरेश कदम (वय २५, रा. लोणी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यावर जेजुरी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी त्यांच्या मोक्का कोठडीत वाढ करण्याची मागणी सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी केली होती.