बॉलिवूड सेलेब्सचे नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरोधात पत्र

नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजुर झाल्यानंतर आज हे विधेयक राज्यसभेत सादर केलं जाणार आहे. मात्र या विधेयकावरुन देशभरात राजकीय, सामाजिक क्षेत्रातून विरोध होत आहे. यातच आता बॉलिवूड सेलेब्सनेसुद्धा विधेयकाविरोधात खुलं पत्र लिहिलं आहेत.


नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरोधात देशातील 727 नामवंत, प्रतिष्ठित व्यक्तींनी खुलं पत्र लिहिलं आहेत. यामध्ये माजी न्यायाधीश, वकील, लेखक, अभिनेते, सामाजिक कार्यकर्ते इत्यादींचा समावेश आहे. बॉलिवूड सेलेब्समध्ये जावेद अख्तर, नसिरुद्दीन शाह यांनीही याबाबत पत्र लिहिलं आहे.

दरम्यान, या पत्रात लिहिल की,’भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात जे मार्गदर्शन मिळाल होत, त्या सर्वसमावेशकता आणि दूर दृष्टीकोनावर घाला घालणारे हे विधेयक आहे. हे विधेयक असंविधानिक आणि भेदभाव पसरवणार असल्याच आम्ही मानतो. या विधेयकामुळे भारताच्या लोकशाहीच्या मुलभूत अधिकारांच नुकसान होईल.’ तसेच नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरोधात पत्र लिहिणाऱ्या व्यक्तींनी हे विधेयक मागे घेण्याची मागणी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.