Bollywood – बॉलिवूडचा प्रसिद्ध पार्श्वगायक अरिजित सिंगची गाणी चाहत्यांना खूप आवडतात. अरिजितचे जवळपास प्रत्येक गाणे सुपरहिट आहे. अरिजित सिंग त्याच्या गाण्यांव्यतिरिक्त त्याच्या साधेपणासाठीही ओळखला जातो. याशिवाय तो त्याच्या स्वभावासाठी प्रसिद्ध आहे. नुकताच या गायकाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो त्याच्या चाहत्यांवर नाराज होताना दिसत आहे.
दरम्यान, अलीकडेच अरिजित सिंगचा एक फोटो समोर आला आहे, जो फेसबुक पेजवर शेअर करण्यात आला. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक दुचाकीस्वार अरिजित सिंगच्या कारचा पाठलाग करत आहे, त्यानंतर तो एका ठिकाणी थांबतो आणि अरिजित सिंगच्या कारची काच फोडतो. बाईक चालवणारा गायकाचा चाहता त्याच्यासोबत एक फोटो क्लिक करण्यासाठी हे करत होता.
व्हिडिओमध्ये पुढे पाहिले जाऊ शकते की, त्या व्यक्तीने गायकाच्या कारची काच फोडल्यानंतर अरिजित सिंग काच खाली करतो आणि म्हणतो, “तुम्हाला माहित आहे का तुम्ही किती वेळा हॉर्न वाजवला आहे. असे कोणाला त्रास देत आहात? मी की रस्त्याने जाणारे इतर लोक? आणि मला भेटायचे आहे म्हणून तुम्ही हे करत आहात, त्यामुळे तुम्हाला इतरांना त्रास देण्याचा अधिकार आहे का?”असं म्हणत त्याने चाहत्यांची शाळाच घेतली आहे.
यादरम्यान, अरिजित सिंग खूपच संतापलेला दिसत होता. अरिती सिंगने चाहत्याला सांगितले की, “तुम्हाला फोटो क्लिक करायचे आहे का? तू हे सगळं फक्त एका फोटोसाठी केलंस ना? तुमचा फोटो घ्या. पण असे जोरात हॉर्न वाजवू नकोस.” अरिजित सिंगचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.