अभिनेता कमाल आर खानने पुन्हा एकदा बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानशी पंगा घेतला आहे. केआरकेने ट्विटरवर शाहरुख खानला म्हातारा म्हटले. शाहरुखने यापुढे अॅक्शन चित्रपट करू नये, असे केआरकेचे म्हणणे आहे. यानंतर शाहरुखच्या चाहत्यांनी त्याला चांगलेच सुनावले आहे. याशिवाय केआरकेने रणबीर कपूरचीही खिल्ली उडवली आहे.
केआरकेने ट्विटरवर शाहरुख खानची एक मुलाखत शेअर केली आहे, ज्यामध्ये शाहरुखने म्हटले आहे की, तो रोमान्ससाठी म्हातारा झाला आहे पण अॅक्शन चित्रपटांसाठी नाही. यावर केआरकेने लिहिले, “अरे भाई जान! असे करू नको. म्हातारपणात हाड मोडले तर जोडणे कठीण होणार. या ट्विटवर एका यूजरने लिहिले की, “भीक मागणे वाईट आहे, पण महापुरुषांबद्दल नकारात्मक गोष्टी लिहिणे हा पैसा कमावण्याचा योग्य मार्ग आहे.”
यासिर खानने लिहिले, “जो स्वतः लहानपणापासून विग (नकली केस) घालतो आहे, ज्याचा स्टाईल आणि बॉडी बिल्डिंगशी काहीही संबंध नाही, तो अॅक्शन आणि रोमान्सबद्दल बोलत आहे. तेही काही लाईक्ससाठी.’
रणबीर कपूरही खिल्ली उडवली केआरकेने
रणबीर कपूरचा एक फोटो शेअर करताना त्याच्या केसांची खिल्ली केआरकेने उडवली आहे. केआरकेने लिहिले, “रणबीर भाई ही वाली विग छान आहे. असे लावा, तुम्ही मस्त दिसत आहात. केआरकेच्या या ट्विटवर युजर्सनी त्याची जोरदार ताशेरे ओढले आहेत. सोनू नावाच्या युजरने लिहिले की, “तुझ्यापेक्षा चांगला आणि स्वस्त विग कोण घालतो भाऊ.” दुस-या युजरने लिहिले की, “तुझ्यापेक्षा कमीत कमी एक लाख पटीने चांगला आहे.” केआरकेने रणबीरच्या केसांची खिल्ली उडवली तेव्हा अनेक यूजर्सनी त्याचे जुने फोटो शेअर केले. ज्यामध्ये केआरकेच्या डोक्यावर खूपच कमी केस दिसत आहेत. यासोबतच यूजर्स त्याला टक्कलही म्हणत.