मुंबई – छोट्या पडद्यावरील ‘द कपिल शर्मा’ कायम चर्चेत राहिला आहे. अनेक सेलिब्रिटी या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या शोमध्ये हजेरी लावतात. या शोमध्ये आता लवकरच अभिनेता सनी देओल आणि अभिनेत्री आमिषा पटेल ‘गदर 2’च्या प्रमोशनसाठी हजेरी लावणार आहेत. यावरून आता अभिनेता आणि विश्लेषक केआरकेने कपिल शर्मा शो आणि ‘गदर 2’ वर टीका केली आहे.
केआरकेने ट्विट करत लिहिले की, ‘गदर २ सिनेमाची संपूर्ण टीम आज ‘द कपिल शर्मा’ शोमध्ये पोहोचली आहे. ‘गई भैंस पानी में’ आता हा सिनेमासुद्धा ब्लॉकडस्टर होणार” असं म्हणत केआरके याने ‘गदर २’ फ्लॉप होणार असल्याची भविष्यवाणी केली आहे. यानंतर त्याने आणखी एक ट्वीट करत लिहिले की, ‘‘द कपिल शर्मा’ शोमध्ये एखाद्या सिनेमाचं प्रमोशन होत असले तर तो सिनेमा फ्लॉप ठरणार असं मी अनेकदा सांगितलं आहे. लोक कपिलच्या फायद्यासाठी त्याचा सिनेमा पाहत नसतील तर इतरांचे सिनेमे का बघतील. कपिल प्रत्येक सिनेमासाठी पनौती आहे.” यात त्याने कपिल याचा पनौती म्हणून उल्लेख केला आहे.
Today Team #Gadar2 is shooting for Kapil Sharma show! Gayee Bhains Paani Main. Now nobody can save this film from becoming a BlockDuster.
— KRK (@kamaalrkhan) June 20, 2023
I repeat, if a film is promoted on Kapil Sharma Show means that film will become a sure shot flop. Reason is very simple, If people don’t watch Kapil’s film for Kapil then why will they watch any other film for Kapil. Kapil is the most Panauti Insaan for films.
— KRK (@kamaalrkhan) June 21, 2023
याआधीही केआरकेने कपिल शर्माच्या शोला पनौती म्हटले होते. त्यासाठी त्याने ‘पठाण’ आणि ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटांची उदाहरणे देऊन आपले म्हणणे मांडले होते. केआरकेने यापूर्वी केलेल्या एका ट्विटमध्ये लिहिले होते की, ‘शाहरुख खानने कपिल शर्माच्या शोमध्ये त्याच्या ‘पठाण’ चित्रपटाचे प्रमोशन केले नाही आणि हा चित्रपट सुपरहिट ठरला आहे. त्याचप्रमाणे कपिलच्या शोमध्ये ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाचे प्रमोशनही झाले नव्हते आणि हा चित्रपटही सुपरहिट ठरला होता. अशा स्थितीत कपिल शर्माचा शो चित्रपटांसाठी मोठी पनौती असल्याचा हा पुरावा आहे,’ असे केआरकेने यापूर्वी केलेल्या एका ट्विटमध्ये लिहिले होते.
SRK didn’t promote #Pathaan on Kapil Sharma show and film is superhit. Film #Kashmirfiles was not promoted on Kapil Sharma show and film was superhit. So It’s proof that Kapil Sharma show is a Big Panauti for the films. Hope others also won’t promote their films on PANAUTI show.
— KRK (@kamaalrkhan) February 5, 2023
दरम्यान, ‘गदर-2’ हा सिनेमा11 ऑगस्ट 2023 रोजी गदर-2 रिलीज होणार आहे. यात तारा सिंग म्हणजेच सनी देओलच्या मुलाची कथा दाखवण्यात येणार आहे. सध्या या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहे.