Bollywood: अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) यांचा ‘अॅनिमल’ चित्रपट सध्या चर्चेत आहे. काहीच दिवसांपुर्वी ‘अॅनिमल’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला होता. हा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस पडला. चाहत्यांनी यातील रणबीर आणि रश्मिकाच्या लुकचे कौतुक केले होते. मात्र या सिनेमातील रश्मिकाच्या अभिनयाची अभिनेता के आर के अर्थात कमाल आर खानने खिल्ली उडवली आहे. त्याने ट्वीट करत रश्मिकावर टीका केली आहे. सध्या त्याचे हे ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
केआरकेने एक्स अकाऊंटवर ‘अॅनिमल’ ट्रेलरची एक क्लिप शेअर केली. या क्लिपमध्ये रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना दिसत आहेत. हा व्हिडिओ शेअर करत त्याने ट्वीटमध्ये लिहिले की, ‘रश्मिका मंदानाला अभिनय कसा करावा हे माहित नाही आणि तरीही तिला चित्रपट मिळत आहेत त्याचा हा पुरावा आहे. पण जर बॉलीवूडमध्ये फक्त अभिनय हा निकष धरुनच चित्रपट द्यायचे झाले असते तर कतरिना, जॅकलीन, नर्गिस वगैरे आज अभिनेत्रीच नसत्या.”
It’s proof that @iamRashmika doesn’t know acting and still getting films. But Agar Bollywood Main acting Se Hi films Milti, Toh Fir Toh Katrina, Jacquline, Nargis etc actress Hi Nahi Banti. pic.twitter.com/pdEi5xWe3K
— KRK (@kamaalrkhan) November 24, 2023
या सिनेमात रणबीर कपूर, रश्मिका मंदाना, अनिल कपूर आणि बॉबी देओल यांची प्रमुख भुमिका आहे. संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित हा सिनेमा रोमान्स आणि अॅक्शनने भरलेला असल्याचे ट्रेलरद्वारे स्पष्ट होते. येत्या 1 डिसेंबर 2023 ला सिनेमागृहात रिलीज होणार आहे. मात्र आता पासूनच ‘अॅनिमल’ सिनेमाचे आगाऊ बुकिंग सुरू झाले असून हा सिनेमा ‘पठाण’ आणि ‘जवान’चे रेकॉर्ड तोडण्यासाठी सज्ज असल्याचे यातून दिसून येत आहे.
गुरुवारी संध्याकाळी 5 वाजता हैदराबादमध्ये चित्रपटाच्या आगाऊ बुकिंगसाठी काही स्लॉट उघडण्यात आले आणि काही तासांतच या चित्रपटाची 5000 हून अधिक तिकिटे विकली गेली. अॅडव्हान्स बुकिंग अद्याप पूर्णपणे सुरू झालेले नाही, 26 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. त्याच वेळी, यूएई आणि अमेरिकेसह अनेक ठिकाणी या चित्रपटाची आगाऊ बुकिंग वीकेंडला सुरू होणार आहे.