चेन्नई – तामिळनाडूमधील नेवेली पावर प्लांटमध्ये बॉयलरचा भीषण स्फोट झाला आहे. यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला असून १७ जण जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले आहे.
#UPDATE – 6 dead & 17 injured in an explosion at a boiler of Neyveli lignite plant: M. Sree Abhinav, Cuddalore Superintendent of Police https://t.co/jtaOudE9P0
— ANI (@ANI) July 1, 2020
मिळालेल्या माहितीनुसार, तामिळनाडूच्या कुडलोरमधील नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशनच्या बॉयलरमध्ये हा स्फोट झाला. हा स्फोट नेमका कशामुळे झाला याचे नेमके कारण अद्याप समजले नाही. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल घटनास्थळी पोहचले आहे. या स्फोटामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला असून १७ जण जखमी आहेत. तर काही कामगार आतमध्ये अडकल्याची शंका अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
Tamil Nadu: Explosion at a boiler in stage -2 of the Neyveli lignite plant. 17 injured persons taken to NLC lignite hospital. Visuals from the spot. More details awaited. https://t.co/jtaOudE9P0 pic.twitter.com/FWKYNsePVO
— ANI (@ANI) July 1, 2020
दरम्यान, याआधीही ७ मे रोजी एनएलसी इंडिया औष्णिक वीज प्रकल्पात बॉयलरचा स्फोट झाला होता. त्या दुर्घटनेत ८ कामगार भाजले होते.