वाल्हे: “महाविकास आघाडी सरकारने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन, वाल्हे व पंचक्रोशीमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. जगावर तसेच देशावर कोरोनामहामारीचे मोठे संकट आहे. या कोरोनाच्या संकटामध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने रक्तदानाचे आव्हान केले असून आपणही रक्तदान करून गरजू व्यक्तीला मदत केली पाहिजे; ‘रक्तदान हे जगामधिल सर्वश्रेष्ठ दान आहे’. कदाचित तुमच्या रक्ताच्या बाटलीमुळे एखाद्या व्यक्तींचा जिव वाचू शकतो, अशी कळकळीची विनंती, पुणे जिल्हा बॅकेचे माजी अध्यक्ष प्रा.डॉ.दिगंबर दुर्गाडे यांनी वाल्हे (ता.पुरंदर) येथे रक्तदान शिबिराच्या वेळी केली.
जागतिक रक्तदाता दिनाचे औचित्य साधत, तसेच कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारने केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत, वाल्हे (ता.पुरंदर) येथील प्रा.डॉ.दिगंबर दुर्गाडे सर व मिञ परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उदंड प्रतिसाद मिळाला. पुणे जिल्हा बॅकेचे माजी अध्यक्ष प्रा.डॉ.दिगंबर दुर्गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाल्हे ग्रामपंचायतीच्या कार्यालयामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रा.डॉ.दिगंबर दुर्गाडे यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी सरपंच अमोल खवले, उपसरपंच सूर्यकांत भुजबळ, माजी सरपंच दत्तात्रय पवार, महादेव चव्हाण, माजी उपसरपंच सूर्यकांत पवार, प्रा.संतोष नवले, ग्रामविकास अधिकारी बबन चखाले, हनुमंत पवार, सुनिता ढोबळे, जयवंत भुजबळ, पिसुर्टीचे माजी सरपंच अशोक बरकडे, डॉ.रोहिदास पवार, नारायण पवार, सुभाष दुर्गाडे, संभाजी पवार, आदी उपस्थित होते.
यावेळी रक्तदान शिबिरांच्या ठिकाणी शासनाच्या नियमांचे पालन करीत तरूण कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबिराला मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून रक्तदान केले. रक्तदान शिबिरामध्ये अनेक मान्यवरांनी रक्तदान केले. तसेच सामाजिक बांधिलकी जपत वाल्हे पोलिस दूरक्षेत्रात पोलिस समीर हिरगुडे, महेश गोघरे, वाल्हे ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी बबन चखाले, तसेच प्रभातचे पत्रकार समीर भुजबळ यांच्यासह इतर पत्रकारांनी रक्तदान करून शासनाच्या आव्हानाला प्रतिसाद दिला.
तसेच शहाजी भुजबळ यांनी वाढदिवसाच्या दिवशी रक्तदान करून आपला वाढदिवस साजरा केला. तसेच विविध सामाजिक संस्थेचा अधिकारी, पदाधिकारी,सामाजिक, राजकीय, शैक्षणिक,सहकार क्षेत्रातील अनेक मान्यवर, तसेच अनेक तरूण कार्यकर्त्यांनी उस्फूर्तपणे रक्तदान केले.
यावेळी, जवळपास १२० ते १२५ रक्तदात्यांनी यावेळी रक्तदान केले. यावेळी रक्तदान शिबिरामध्ये सहभागी रक्तदात्यांना प्रा.डॉ.दिगंबर दुर्गाडे यांच्या हस्ते प्रमाणपञाचे वाटप करण्यात आले.
सरपंच अमोल खवले यांनी प्रास्ताविक केले. विद्यार्थी राष्टवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संदेश पवार, अभि दुर्गाडे, नवनाथ चव्हाण यांनी आभार मानले.