माधवराव पाटणकर यांच्या निधनाबद्दल उपमुख्यांमत्र्यांकडून श्रद्धांजली

मुंबई : मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे सासरे आणि दैनिक ‘सामना’च्या संपादक रश्मीताई ठाकरे यांचे वडील, उद्योजक माधवराव पाटणकर यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुःख व्यक्त केले असून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

रश्मीताईंना पितृवियोगाचे दुःख सहन करण्याचे बळ मिळो. पवार कुटुंबीय आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठाकरे आणि पाटणकर कुटुंबियांच्या दुःखात सामील आहेत, असेही उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.