Black Fungus ची दाहकता ! ६ महिने बेडवर, १३ सर्जरी, तरी काढावा लागला तरुणाचा डोळा; खर्च झाले दीड कोटी

नागपूर – करोना संसर्गातून बर झाल्यानंतर होणाऱ्या जीवघेण्या म्युकरमायकोसिस अर्थात ब्लॅक फंगस आजारामुळे आजवर अनेकांना जीव गमवावा लागत आहे. अनेकांनी या आजारात आपले डोळे, जबडा गमावला आहे. ब्लॅक फंगस आजाराने ग्रस्त विदर्भातील तरुणाची हृदयद्रावक कहानी समोर आली आहे.

विदर्भात राहणाऱ्या नवीन पाल या ४६ वर्षीय तरुणाला १३ सर्जरीनंतरही ब्लॅक फंगसमुळे त्याचा डोळा गमावावे लागला. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात नवीनला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्याला काळ्या बुरशीचे संक्रमण झाले. त्यानंतर पुढील सहा महिने नवीन रुग्णालयात उपचार घेत होता.

या सहा महिन्यांच्या उपचारात नवीनवर १३ सर्जरी करण्यात आल्या. इतक्या सर्जरी करुन देखील नवीनला आपला एक डोळा गमवावा लागला. नवीनच्या या कहाणीने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या उपचारासाठी नवीनला आतापर्यंत एक कोटी ४८ लाख रुपये खर्च आला. सुदैवाने नवीनची पत्नी रेल्वेत काम करत असल्याने त्यांना रेल्वेकडूनही मदत मिळाली आहे.

नवीनच्या कुटुंबियांनी आणि मित्रांनी उपचारासाठी ४८ लाख रुपये उभारले होते. तरी नवीनला आता एका डोळ्याने अंधत्वाला सामोरे जावं लागणार आहे. ब्लॅक फंगसने मला आयुष्यभरासाठी जखमा दिल्या आहेत. हे मी कधीच विसरू शकणार नाही, अशा भावना नवीनने व्यक्त केल्या.

डॉक्टरांनी म्हटलं की, नवीन पाल विदर्भातील ब्लॅक फंगसचा पहिला रुग्ण होता. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये त्याला करोनाची लागण झाली होती. काही दिवसांनी नवीनच्या डोळ्यांना आणि दातांमध्ये त्रास जाणवत होता. त्याला ब्लॅक फंगसची लागण झाली होती. सहा महिन्यांच्या उपचारादरम्यान नवीनवर १३ सर्जरी झाल्या. अखेर ब्लॅक फंगस रोखण्यासाठी नवीनचा एक डोळा काढवा लागला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.