मुंबई – टीव्ही अभिनेत्री दिशा परमार लवकरच आई होणार आहे. काही दिवसांपूर्वी तिने सोशल मीडियावर ही आनंदाची बातमी दिली होती. दिशा परमार सध्या तिच्या प्रेग्नेंसीचा टप्पा एन्जॉय करत आहे. नुकतेच तिने इंस्टाग्रामवर तिचे काही खास फोटो शेअर केले आहे. ज्यामध्ये दिशा बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे. दिशाने शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
इनस्टाग्रामवरील दिशाचा फोटो ब्लॅक अँड व्हाईट स्वरूपाचा आहे. यात तिने बेबी बंप फ्लॉन्ट केल्याचे दिसते. मात्र तिने मोबाइलद्वारे आपला चेहरा दिसू दिलेला नाही. तिच्या या फोटोवर दिशा परमारचा पती आणि गायक राहुल वैद्य याने या फोटोंवर प्रतिक्रिया दिली आहे. ‘माय बेबीज…’ असे राहुलने म्हंटले आहे.
View this post on Instagram
दरम्यान, दिशाला ‘प्यार का दर्द है मीठा मीठा प्यारा प्यारा’ या शोमधून प्रसिद्धी मिळाली. बर्थडे सरप्राईज म्हणून राहुलने दिशाला बिग बॉस 14 मध्ये प्रपोज केले होते. दिशाने त्याला उत्तरही पाठवले आणि व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी शोमध्ये भेटायलाही गेली. दोघेही कॉमन फ्रेंड्सच्या माध्यमातून भेटले होते आणि त्यांच्यात मैत्री झाली होती. 2019 मध्ये राहुल वैद्यच्या “याद तेरी” या गाण्याच्या म्युझिक व्हिडिओमध्येही दिशा दिसली होती.