Nick Jonas| अभिनेत्री प्रियांका चोप्राने बॉलीवूडसह हॉलीवूडमध्ये देखील मोठे यश मिळवले आहे. नेहमीच ती कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. मात्र आता तिचा पती निक जोनसबाबत एक माहिती समोर आली आहे. निक जोनास नुकताच मेक्सिकोमध्ये आपल्या भावांसोबत एक कॉन्सर्ट करणार होता, परंतु एका गंभीर आजाराने त्याला ग्रासले आहे. त्यामुळे त्याचे शो रद्द करण्यात आले आहेत. निक जोनासने सोशल मीडियावर एका व्हिडिओमध्ये ही माहिती दिली आहे.
निकने त्याच्या चाहत्यांची माफी मागत एक व्हिडिओ त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. तसेच यामध्ये त्याने त्याच्या कॉन्सर्टच्या नव्या तारखाही सांगितल्या आहेत. निकने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये त्याची अवस्था फारच वाईट झालेली दिसत आहे. निकला इन्फ्लुएंझा ए हा आजार झाल्याचे समोर आले आहे.
काय म्हणाला निक जोनास ? Nick Jonas|
या व्हिडिओत तो म्हणतो की, ‘मित्रांनो, मी सर्वत्र पसरत असलेल्या भयंकर इन्फ्लूएंझा-ए व्हायरसशी लढत आहे. त्यामुळे सध्या मला गाणंही जमत नाहीये. म्हणूनच मी मॅक्सिकोमधीलही शो करु शकणार नाही. पण हे शो ऑगस्टमध्ये पुन्हा शेड्युल्ड केले जात आहेत. मागील काही दिवसांपासून निकला हा त्रास होत असल्याचंही त्याने सांगितलं आहे.
View this post on Instagram
पुढे तो म्हणाला की, ‘मी काल दिवसभर बेडवरून उठू शकलो नाही. अंगदुखी, ताप, घसा खवखवणे आणि खूप खोकला आहे. स्टेजवर जाऊन परफॉर्म करण्याची माझ्यात क्षमता नाही. त्यामुळे मला माफ करा. तुम्ही लोक आम्हाला सपोर्ट करण्यासाठी खूप काही करता. मी परफॉर्म करू शकणार नाही याची मला खंत आहे. पण मला लवकर बरे व्हायचे आहे.’ दरम्यान, आता रद्द करण्यात आलेले निक जोनासच्या कॉन्सर्टचे सर्व शो ऑगस्टमध्ये होतील. आता त्याचा शो 21 आणि 22 ऑगस्टला होणार आहेत.
हेही वाचा:
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रामललाचे घेणार दर्शन; अयोध्येत करणार रोड शो