भाजपच्या माजी आमदाराची कुमारस्वामींवर पातळी सोडून टीका

देशभरामध्ये आज २०१९ लोकसभा निवडणुकांसाठी तिसऱ्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. १७वी लोकसभा स्थापन करण्यासाठी यंदा ७ टप्प्यांमध्ये निवडणुका घेण्यात येणार असून देशाची जनता आपला कौल कोणत्या राजकीय पक्षाला देते याचा उलगडा २३ मे रोजी होणार आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यांमधील उमेदवारांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु असून विविध राजकीय पक्षांकडून आपापले स्टार प्रचारक प्रचारासाठी उतरविण्यात आले आहेत. अशातच आता राजकीय वातावरण देखील तापले असल्याने लोकसभा निवडणुकांच्या प्रचारामध्ये विविध पक्षांच्या नेत्यांकडून पातळी सोडून टीका केल्याची अनेक उदाहरणे पाहायला मिळत आहेत.

याच पार्शवभूमीवर भाजपचे माजी आमदार राजू केज यांनी आता कर्नाटकचे मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांच्यावर पातळी सोडून टीका केली असून ते म्हणतात, “कुमारस्वामी म्हणतात मोदी वारंवार कपडे बदलतात, होय मोदी वारंवार कपडे बदलतात कारण ते दिसायला सुंदर आहेत पण कुमारस्वामी तुम्ही जर दिवसातून १००वेळा जरी अंघोळ केली तरी तुम्ही काळा रेडाच राहाल.”

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.