वाघोली- राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा करून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर वाघोली येथे भाजप पदाधिकारी व अजित पवार समर्थकांनी आनंदोत्सव साजरा केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून फटाके फोडत पेढे वाटप केले.