कोहिमा : नागालॅंड आणि मेघालयमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने 20 उमेदवारांची घोषणा केली आहे. ( BJP To Contest 20 Seats In Nagaland Election) भाजप नेते नलिन कोहली यांनी सांगितले की, भाजप नागालॅंडमध्ये 20 जागा लढवणार आहे, तर उर्वरित जागा मित्रपक्ष एनडीपीपीला दिल्या आहेत.
नागालॅंड भाजपचे प्रदेशाध्यक्ष टेमजेन इम्ना यांना पक्षाने अलंगटाकी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. इतर नावेही जाहीर करण्यात आली आहेत.
याशिवाय भारतीय जनता पक्षाने मेघालय विधानसभा निवडणुकीसाठी सर्व 60 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत.
नलिन कोहली म्हणाले की, मेघालय निवडणुकीसाठी आमची टॅगलाइन ‘एम पॉवर मेघालय’ म्हणजेच ‘मोदी पॉवर्ड मेघालय’ आहे, ते म्हणाले की, लवकरच येथेही दुहेरी इंजिन सरकार स्थापन होईल.