पुणे :- आज विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाचा निकाल आहे. विधानपरिषदेच्या 2 पदवीधर, 3 शिक्षक मतदारसंघांचा आज निकाल लागतोय. विधान परिषदेच्या पाच जांगापैकी दोन जागेचे निकाल हाती आले आहेत. कोकण विभाग शिक्षक मतदारसंघातून भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे हे विजयी झाले आहेत. तर नागपुरमध्ये भाजपच्या मातृसंस्थेच्या बालेकिल्यात महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर आडबाले विजयी झाल्याने भाजपला जोरदार धक्का बसला आहे.
राज्यातील 5 पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीचा आज निकाल जाहीर होत आहे. त्यामध्ये टप्प्याटप्प्याने निकाल हाती येत आहेत. कोकण विभाग शिक्षक मतदारसंघातून भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे हे विजयी झाले असून त्यांनी शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील यांचा पराभव केला. ज्ञानेश्वर म्हात्रे यांना एकूण 20 हजार 83 मतं पडली तर बाळाराम पाटील यांना 10 हजार 997 मतं पडली. म्हात्रे यांचा एकूण 9 हजार 86 मतांनी विजय झाला आहे.
तर दुसरीकडे नागपूर पदवीधर मतदार संघाच्या या निवडणुकीत सुधाकर आडबाले यांना 14 हजार 61 मतं मिळाली आहेत तर त्यांच्या विरोधात उभे असलेले भाजपाचे उमेदवार नागो गाणार यांना 6 हजार 309 मत मिळाली आहेत.
नागपूर विभागातील उमेदवार नागो गाणार यांच्या पेक्षा दुप्पट मतं सुधाकर आडबाले यांनी घेत आपल्या विजयावर शिक्का मोर्तब केले. त्यांच्या विजयाची घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जाहीर करताच काँग्रेसह महाविकास आघाडीतील मित्र पक्षांनी जोरदार जल्लोष साजरा केला.
भाजपच्या मातृसंस्थेच्या बालेकिल्ल्यातच महाविकास आघाडीचा भाजपला दणका.
नागपूर शिक्षक मतदारसंघातून महाविकास आघाडीचे सुधाकर अडबोले विजयी.
— Nana Patole (@NANA_PATOLE) February 2, 2023
दरम्यान, सुधाकर आडबाले यांच्या विजयानंतर ट्विट करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपला डिवचलं आहे. ‘भाजपच्या मातृसंस्थेच्या बालेकिल्ल्यातच महाविकास आघाडीचा भाजपला दणका. नागपूर शिक्षक मतदारसंघातून महाविकास आघाडीचे सुधाकर आडबाले विजयी’. असं ट्विट नाना पटोले यांनी केलं आहे.