वडगाव मावळ – संत तुकाराम साखर कारखाना निवडणुकीमध्ये अनेक घडामोडींना वेग आला आहे. आता मावळ तालुका भाजपा कार्यालयामध्ये पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक मंगळवारी (दि. 11) रोजी झाली. त्यामध्ये तालुक्यातील साखर कारखाना निवडणूक या विषयावर चर्चा होत आहेत.
माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट करत असताना ही निवडणुक सहकार क्षेत्रातील असल्याने सर्व पक्षीय म्हणून भाजपा या निवडणुकीला सामोरे जात आहे. मावळ तालुक्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी एकजुटीने सर्व पक्षीय पॅनललाच निवडून देण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.
या वेळी माजी आमदार दिगंबर भेगडे, शेतकरी संघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष शंकरराव शेलार, माजी सभापती धोंडिबा मराठे, एकनाथ टिळे, प्रभारी भास्करराव म्हाळस्कर, अध्यक्ष रवींद्र भेगडे यांनी देखील मनोगत व्यक्त केली.
यावेळी तळेगावचे माजी नगराध्यक्ष बाळासाहेब जांभुळकर, कारखान्याचे माजी संचालक शिवाजीराव टाकवे, सुभाषराव बोडके, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, उपसभापती दत्तात्रय शेवाळे, शांताराम कदम, कल्याणी ठाकर, प्रशांत ढोरे, महिला अध्यक्षा वैशाली बोत्रे, संतोष कुंभार, किरण राक्षे, किरण भिलारे, अनंता कुडे आदी पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरचिटणीस सुनील चव्हाण केले. प्रसिद्धीप्रमुख अनंता कुडे यांनी आभार मानले.