पुणे – कसबा पोटनिवडणुकीची मतमोजणी आज सकाळी आठ वाजता सुरु झाली. काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर पहिल्या पाच फेऱ्यांमध्ये आघाडीवर आहेत. तर हेमंत रासणे हे पिछाडीवर आहेत. रासने विरुद्ध धंगेकर अशी कांटे की टक्कर या ठिकाणी पाहायला मिळत आहे. अठराव्या फेरीमध्ये धंगेकर यांनी तब्बल 9 हजार 440 मतांनी आघाडी घेतली आहे. दोन्ही बाजूचे दिग्गज नेते, मंत्री, आमदार, खासदार या मतदारसंघांमध्ये ठाण मांडून बसले होते. त्यामुळे आजच्या निकालाकडे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलं आहे.
यावर आता भाजप प्रदेशाअध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले,’कसबा आणि चिंचवडमध्ये होत असलेल्या निवडणुकीत कसब्यामध्ये सध्या आम्ही मागे दिसत असलो तरी सगळे चित्र हे अजूनही स्पष्ट झाले नाही. सध्या मागे असलो तरी निकाल आमच्या विरोधात आहे हे आता सांगणे कठीण आहे निवडणुकीत कुठलीही प्रतिष्ठा पणाला लावली नव्हती. इतर निवडणुकीप्रमाणेच निवडणूक लढलो जर आमचा पराजय झाला तर का झाला याची कारणे शोधले जाईल.’ असेही ते म्हणाले आहे