पुणे – गेल्या महिन्याभरापासून प्रचंड चर्चेत राहिलेल्या कसबा आणि पिंपरी-चिंचवड या पुण्यातील दोन विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा आज निकाल आहे, संपूर्ण राज्याचं लक्ष या निकालाकडे लागले आहे. कसब्यातील दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील व्यक्तींना उमेदवारी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त होत असताना भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी दिली आहे तर मविआकडुन रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली असून, आता कसब्यात रवींद्र धंगेकर हे किंगमेकर ठरल्याचं दिसून येत आहे.
बालेकिल्ला असलेल्या कसबा मतदारसंघामध्ये भाजपला पराभवाचा सामना करा लागला आहे. काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी निर्णायक आघाडी घेतली आहे. त्यामुळे भाजपचा पराभव हा अटळ झाला आहे. मतमोजणीपासून धंगेकर यांनी तब्बल 6 हजार 700 मतांनी आघाडी घेतली आहे. तर रासने यांना 50490 मतं मिळाली आहे. दरम्यान, 11 हजार 40 मतांनी धंगेकर विजयी झाले आहेत.