यवतमाळ : यवतमाळ पंचायत समिती सभापती, उपसभापती पदासाठीच्या निवडणुकीत भाजप शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. राष्ट्रवादी, शिवसेनेच्या दोन कार्यकर्त्यांनी बंडखोरी केल्यामुळे तणाव निर्माण झाला होता. राष्ट्रवादीचे सदस्य नरेश ठाकूर, आणि शिवसेनेच्या नंदाबाई लडके या भाजपमध्ये दाखल झाल्या.
भाजप जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्याम जयस्वाल गट आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड या नेत्यांमध्ये बाचाबाची झाली, तर काही कार्यकर्त्यामध्ये धक्काबुक्की झाली.
पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. या तणावपूर्ण परिस्तिथीत शिवसेनेच्या बंडखोर नंदा लडके यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तणावाची परिस्थिती लक्षात घेता पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे.