तेहरान : इराकमधील अमेरिकेच्या तळावर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर इराणचे राष्ट्रप्रमुख आयातुल्लाह खोमेनी म्हणाले, काल रात्री आम्ही अमेरिकेच्या कानफटात लगावली.
इराणच्या रिव्हॉल्युशनरी गार्ड या लष्करी दलाचा प्रमुख असणाऱ्या कासीम सुलेमानी याची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाने हत्या करण्यात आली. त्याचा बदला म्हणून इराकने अमेरिकेच्या तळावर 15 क्षेपणास्त्र डागली. त्यात 80 अमेरिकन सैनिक मारले गेल्याच दावा करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर आयातुल्ला खोमेनी हे सरकारी टीव्हीवर केलेल्या भाषणात म्हणाले, कालरात्री अम्ही अमेरिकेच्या कानफटात मारली आहे.
दरम्यान, पाकिस्तानच्या एका माजी लष्कर प्रमुखाने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेचे आव्हान पेलण्यास इराण सक्षम आहे. तर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी अमेरिकेने काळजी घ्यावी,असा सल्ला दिल्याचे इराणच्या सरकारी वृत्त संस्थेने म्हटले आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी हा क्षेपणास्त्र हल्ला स्व संरक्षणार्थ केला होता, असे केलेले वक्तव्य हा मुत्सद्दीपणाचा नमुना होता, असेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, अमेरिकेमध्ये ट्रम्प यांनी इराणमध्ये केलेल्या कारवाईबद्दल टीका केली जात आहे. इराण प्रश्न हाताळण्यात ट्रम्प यांना अपयश आले. त्यामुळे इराण आणि अमेरिकेत नजिकच्या भविष्यात युध्द होऊ शकते, अशी भावना बहुसंख्य सज्ञान अमेरिकन नागरिकांनी व्यक्त केली.