नवी दिल्ली – भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचे ट्विटर अकाउंट आज सकाळी 10 वाजता हॅक झाल्याची माहिती समोर आली आहे. हॅक झाल्यानंतर नड्डा यांच्या ट्विटर अकाऊंटवरून रशिया आणि युक्रेनच्या मदतीसंदर्भात अनेक ट्विट करण्यात आले.
हॅकर्सनी रविवारी सकाळी त्याचे अकाऊंट हॅक करून एक ट्विट केले. या ट्विटमध्ये ‘माफ करा माझे खाते हॅक झाले. रशियाला देणगी द्यावी, त्यांना मदतीची गरज आहे’, असे म्हटले आहे. हॅकर्सने नंतर प्रोफाइलचे नाव बदलून ICG OWNS INDIA केले. मात्र, आता ते ट्विट डिलीट देखील करण्यात आले आहे.
दरम्यान, आज सकाळीच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांच्या ट्विटर अकाऊंटवरून मी रशियाच्या लोकांसोबत आहे. आता क्रिप्टोकरन्सीचे दान स्वीकार करा, असं ट्विट करत लिंक शेअर करण्यात आल्या होत्या. परंतू, याच ट्विटमध्ये खाली माझा युक्रेनच्या लोकांना पाठिंबा असून त्यांच्यासाठी देखील क्रिप्टोकरन्सीचं दान स्वीकार करा, असे हिंदीमध्येही लिहिले होते. हे दोन्ही ट्वीट हॅकर्सनी केली असल्याचे समोर आले आहे.