मुंबई – छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर कि स्वराज्यरक्षक या वादावर पडदा पडलेला असताना आता भाजप आमदार नितेश राणे यांनी पुन्हा एकदा याबाबत भाष्य केले आहे. यावेळी नितेश राणे यांनी खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्यावर सडकून टीका करत विरोधीपक्षनेते अजित पवार यांची नक्कल केल्याचे पाहायला मिळाले. तसेच कोल्हे हा ऍक्टर पैसे घेऊन महाराजांचे रोल करत असल्याचे देखील राणे यांनी यावेळी म्हंटले.
खासदार कोल्हे यांचा एकेरी उल्लेख करत राणे म्हणाले, “अमोल कोल्हे नावाचा ऍक्टर पैसे घेऊन शिवाजी महाराजांचा रोल करतो तो काही फुकट करत नाही. तो नावासाठी खासदार झाला आहे २०२४ ला त्याला आपटून टाकू. त्याने दाढी काढली तर त्याला कोणी ओळखणार पण नाही तो केवळ सिरीयल पुरताच आहे.” असा घणाघात नितेश राणे यांनी एका सभेदरम्यान केला.
कोल्हेनंतरच्या टीकेनंतर राणे त्यांनी थेट विरोधीपक्षनेते अजित अपवर यांची नक्कलच करून दाखवली. कोल्हे यांना काहीतरी लिहून देतो आणि हे वाचून दाखवतात असंही राणे यावेळी म्हणाले. तसेच धर्मवीर नावाची पदवीही त्यांना पुसून टाकायची आहे असा आरोप देखील यावेळी नितेश राणे यांनी केला. नितेश राणे यांनी आईवेळी राहुल गांधी यांच्यावर देखील जोरदार टीका केल्याचे पाहायला मिळाले.