मुंबई – बॉलीवूडची अभिनेत्री ‘तापसी पन्नू’ बेधडक आणि हटके स्वभावासाठी इंडस्ट्रीत ओळखली जाते. मात्र, कदाचित ती आता बोल्ड लूकसाठीसुद्धा ओळखली जाऊ शकते. नुकतंच तिचा आगामी थ्रिलर चित्रपट ‘फिर आयी हसीन दिलरुबा’च अधिकृत पोस्टर तापसीने सोशल मीडियावर शेअर केलं आहे. सस्पेन्स आणि रोमान्सचा तडका असलेला हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
2021 साली तापसी पन्नूचा ‘हसीन दिलरुबा’ हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचा आता पुढचा भाग म्हणजेच, ‘फिर आयी हसीन दिलरुबा’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच तापसीच्या या नव्या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित झालं असून यात ती अत्यंत बोल्ड अवतारात दिसत आहे. ‘हसीन दिलरुबा’ चित्रपटात तापसीचा बोल्ड अंदाज प्रेक्षकांना अनुभवता आला होता. मात्र, आता हाच बोल्ड अंदाज आगामी चित्रपटात पुन्हा एकदा पाहता येणार आहे.
View this post on Instagram
चित्रपटाच्या पोस्टर मध्ये लाल रंगाची साडी आणि निळ्या रंगाचा बॅकलेस ब्लाऊज परिधान करून तापसी पाठमोरी ताज महालसमोर बसली आहे. याबरोबरच तिच्या हाताची बोटं रक्ताने माखली आहेत. तापसी हा थरकाप उडवणारा पण भुरळ पाडणारा हा बोल्ड आवतर प्रेक्षकांना चांगलाच आवडला असून, फॅन्स देखील तिच्या या लूकवर लाईक्सचा वर्षाव करत आहेत.
दरम्यान, सस्पेन्स आणि रोमान्सचा तडका असलेला ‘हसीन दिलरुबा’ या चित्रपटात अभिनेत्री तापसी पन्नू मुख्य भूमिकेत दिसली होती. तर तिच्याशिवाय अभिनेता ‘विक्रांत मेस्सी आणि अभिनेता हर्षवर्धन राणे’ हे निर्णायक भूमिकेत दिसून आले होते. प्रेक्षकांना देखील या तिघांची केमेस्ट्री आवडली होती.