नवी दिल्ली – तामिळनाडुतील भारतीय जनता पक्षाचे नेते नंदु ला गणेशन यांची मणिपुरच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मणिपुरच्या राज्यपाल नज्मा हेप्तुल्ला यांची याच महिन्याच्या सुरूवातीला मुदत संपली आहे. म्हणून त्यांच्या जागी ही नवीन नियुक्ती करण्यात आली आहे.
नज्मा हेप्तुल्ला या 10 ऑगस्टला निवृत्त झाल्यानंतर त्या राज्याच्या राज्यपालपदाचा अतिरीक्त कार्यभार सिक्कीमचे राज्यपाल गंगाप्रसाद यांच्याकडे सोपवण्यात आला होता. गणेशन हे तामिळनाडुतील जुने भाजप कार्यकर्ते आहेत.
त्यांच्या नियुक्तीचे तामिळनाडुतील भाजप कार्यकर्त्यांनी स्वागत केले आहे. मणिपुरात राज्यपाल म्हणून नज्मा हेप्तुल्ला यांनाच पुन्हा मुदतवाढ मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. पण त्यांना केंद्राकडून ही मुदतवाढ मिळू शकली नाही.