छत्रपती संभाजीनगर – भाजप नेत्या चित्रा वाघ यांना आज न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने चित्रा वाघ यांची याचिका फेटाळून लावली आहे.
राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष मेहबूब शेख यांनी चित्रा वाघ यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता. त्याविरोधात चित्रा वाघ यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल केली होती. मात्र उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली आहे. यामुळे त्यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.